नळदुर्ग, दि. 10 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या मार्च महिन्यापासून सर्वत्र लॉकडाउन होते. त्यामुळे शेती, उद्योगधंदे, नोकरी यावर आर्थिकदृष्टया फार मोठा परिणाम झाला आहे. शेतकरी, व्यापारी वर्ग हतबल झालेला आहे. त्यांना दिलासा म्हणून आरबीआई ने 31 ऑगस्ट पूर्वी कर्ज वसूली करू नये म्हणून घोषणा केली आहे. पण सद्य परिस्थिति पाहता किमान 31 डिसेंबर पर्यंत कर्ज वसूली करू नये, तसेच बैंक, पतसंस्था फायनांस कंपनीच्या कोणत्याही कर्जदारास दबावाने, नोटिसा पाठवून कर्ज भरन्यास प्रवृत्त करू नये, अशी मागणी नळदुर्ग मनसेच्यावतीने शहरातील बँक, पतसंस्था यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदरील निवेदन भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, लोकमंगल मल्टीस्टेट, भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँक, उस्मानाबाद जनता सहकारी बँक, श्रीराम ट्रांसपोर्ट फायनांस कंपनी, रूपामाता मल्टीस्टेट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेट, आप्पासाहेब पाटील नागरी पतसंस्था, फिनो पेमेंट्स बैंक, सखी मल्टीस्टेट को-क्रे. सो. शाखा नळदुर्ग यांना देण्यात आले.
यावेळी मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलीम शेख़, सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के, अरुण जाधव आदीजण उपस्थित होते.
