तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 कोरोना संसर्गजन्य साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर आनंद कंदले मिञ मंडळाच्या वतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील व युवा नेते विनोद गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१० शुक्रवार रोजी आठवडा बाजार येथील भाजी विक्रेत्याना मास्क चे वाटप करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, आनंद कंदले, रत्नदिप भोसले, नानासाहेब डोंगरे, सागर पारडे, रामराजु जाधव, सुलेमान शेख,ओंकार इगवे व सहकारी उपस्थित होते.
 
Top