तुळजापूर, दि. 10 : तालुक्यातील नळदुर्ग येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण यांच्याकडे तुळजापूर नगरपरिषदेचे रिक्त असलेल्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. त्याबाबत तुळजापूर न.प.ला गुरूवार दि. 9 जुलै रोजी नगरविकास विभागाचे आदेश मिळाले आहेत.
तुळजापूरचे मुख्याधिकारी आशिष लोकरे यांची बदली झाल्याचे सदरील पद हे रिक्त होते. दरम्यानच्या काळात लोकरे यांची बदली रद्द करण्याची मागणी नागरिकांमधून होत होती. मात्र अखेर नळदुर्गचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्याकडे तुळजापूर नगरपरिषदेचे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.
