काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मिरकर यांची मुख्यालयाच्या ठिकाणी प्रशासकीय बदली झाली असून त्यांच्या ठिकाणी नव्याने सपोनि दत्तात्रय काळे रुजू झाले आहेत. तामलवाडी परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवल्याबद्दल व कोरोना सारख्या महामारीच्या काळात कडक बंदोबस्त तैनात करत चोख कर्तव्य बजावल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी व कर्मचाऱ्यांनी मिरकर यांचा सत्कार करुन त्यांना निरोप दिला. तर नव्याने रुजू झालेले सपोनि दत्तात्रय काळे यांचा व पोलीस उप निरीक्षक सुबोध जमदाडे यांचा मानाचा फेटा, हार, शाल, श्रीफळ देऊन पोलीस कर्मचारी व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस कर्मचारी गोरोबा गाढवे, तानाजी माने, ओव्हाळ, उपसरपंच दत्तात्रय वडणे, अण्णासाहेब गुंड, प.स.सदस्य दत्तात्रय शिंदे, सावरगावचे सरपंच रामेश्वर तोडकरी, जि.प. सदस्य विक्रमसिंह देशमुख संतोष मगर, प्रभाकर जाधव, यशवंत कुलकर्णी, पोलीस पाटील समाधान डोके उपस्थित होते. प्रारंभी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग म्हेत्रे यांनी केले तर आभार प्रभाकर जाधव यांनी मानले.