तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जणांचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात रविवार दि.५ जुलै गुरुपोर्णिमा महोत्सव कोरोनाच्या सावटाखाली अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
तुळजापूर शहरातील दशअवतार मठ, अरण्यबुवा मठ, वाकोजीबुवा मठ, हमरोजी बुवा मठ, इच्छागिरी मठ, भारतीबुवा मठ, बारालिंग आदीसह मठात गुरुपोर्णिमा दिनाचे औचित्य साधुन धार्मिक पद्धतीने गुरुवर्याच्यां पादुकाची पुजा करण्यात आली. तसेच शहरातील या सर्व मठातील गुरुवर्याचे नागरीकांनी कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर शोसल डिस्टन्स पाळुन गुरुवर्याचा आशीर्वाद घेतला. तसेच गुरु पोर्णिमे दिनी श्री तुळजा भवानी मातेचे अनेक भाविकांनी राजमाता जिजाऊ महाद्वार येथुन बाहेरुनच कळस दर्शन घेतले. या ठिकाणी दर्शन घेतल्या नंतर कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर भाविकांचे नाव व गाव मोबाईल नंबर येथील सुरक्षाकडुन नोंद करण्यात येत होते.
संसर्गजन्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीरात गेल्या मार्च पासुन भाविकांना दर्शन बंद करण्यात आल्यामुळे व्यापार पेठा थंड पडल्या आहेत. अनेक व्यापारी वर्गावर, पुजारी वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. अर्थ कारणामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहे.त श्री तुळजा भवानी मातेचे मंदीर केव्हां उघडेल या आशेवर आहेत. कोरोना संसर्गजन्य रोगामुळे अनेकाच्या उरात धडकी भरली आहे. गेल्या मार्च माहिन्यापासुन पासुन तिर्थ तुळजापुर अक्षरसा ओस पडल्याचे चिञ दिसत आहे. तरी संबधीत प्रशासनानी श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारातील व्यापारी व पुजारी वर्गाचे अतोनात हाल होत असल्यामुळे त्यांच्या बाबतीत योग्य उपाय योजना करण्यात याव्यात अशी खंत अनेक नागरीकातुन केली जात आहे.