नळदुर्ग, दि. 05 : प्राध्यापक भरतीची जाहिरात रद्द करावी, त्यावेळेस भरण्यात आलेल्या प्राध्यापकांचे मासिक वेतन बंद करण्यात यावे, यासह विविध मागण्या मान्य करावे अन्यथा दि. 22 जुलै रोजी उपोषण करण्याचा इशारा नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविदयालयातील प्राध्यापक पंडीत गायकवाड यांनी सहसंचालक उच्चशिक्षण विभाग औरंगाबाद यांना निवेदनाद्वारे दिला आहे. 

निवेदनात पुढे म्हटले आहे की, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नळदुर्ग येथे दि. 21-11-1994 पासून वरीष्ठ महाविद्यालयामध्ये हिंदी विषयाचा प्राध्यापक म्हणून आजपर्यंत कार्यरत आहे. मार्च, एप्रिल, मे 2020 या वर्षाच्या महिण्याचा पगार करण्यात यावा, माझे जीपीएफ खाते उघडावे, माझ्यासमवेत नौकरीत लागलेले प्राध्यापक टी.एल.दबडे, प्राध्यापक शाहूराज घोरपडे यांचे 2016 मध्ये जीपीएफ खाते उघडण्यात आले. मात्र माझे खाते उघडले नाही. त्याचबरोबर जीपीएफची आजपर्यंतची रक्कम ही संस्था व तत्कालीन प्राचार्य डॉ. सुहास पेशवे, डॉ. एस. एस. शिंदे, प्राचार्य डॉ. संजय कोरेकर, प्राचार्य डॉ. मोहन बाबरे, लिपीक चिनगुंडे, लिंबराज मोटे यांच्या पगारातून ही रक्कम देण्यात यावी, तसेच जीपीएफची पाचवा वेतन आयोग, सहावे वेतन आयोगाची व सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यात यावी, सातव्या वेतन आयोगाची वेतननिश्चिती करण्यात यावी, 2001 च्या न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे दि. 10/8/1998 ची प्राध्यापक भरतीची जाहिरात रदद करावी, त्यावेळेस नेमणूक केलेल्या प्राध्यापकांची पगार बंद करावी, त्यावेळेस भरण्यात आलेले प्राध्यापक सध्या चुकीच्या पध्दतीने प्रोफेसर पदापर्यंत गेले आहेत. त्यांना प्रोटेक्शन देण्यात आले आहे. मात्र मला नाही, असे आरोप करुन माझ्याप्रमाणे त्या सर्वांची पगार बंद करावी, आदी मागण्या मान्य न झाल्यास दि. 22 जुलै रोजी औरंगाबाद येथे उपोषण करण्याचा इशारा प्रा.डॉ. पंडीत गायकवाड यांनी दिला आहे. 

या निवेदनाची एक प्रत जिल्हाधिकारी उस्मानाबाद, पोलीस अधिक्षक उस्मानाबाद, तहसिलदार तुळजापूर, पोलीस ठाणे नळदुर्ग, उच्च शिक्षण संचालक पुणे, पोलीस अधिक्षक औरंगाबाद आदींना देण्यात आले आहे.

 
Top