जळकोट, दि. ५ : मेघराज किलजे

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने गुरुपौर्णिमेनिमित्त गावातील सेवानिवृत्त गुरुजनांचा सत्कार करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

जळकोट गावातील सेवानिवृत्त गुरुजन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त भालचंद्र पोतदार, धानप्पा अरबळे,सांबप्पा धरणे, महादेव माने, खंडू चंदे, महादेव सगर, तुकाराम साखरे, सदाशिव मडोळे आदी गुरुजनांचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच पती संजय माने, ग्रामपंचायत सदस्य ऍड. आशीष सोनटक्के, ग्रामपंचायत सदस्य संजय अंगुले, श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष तथा पत्रकार मेघराज किलजे, शिवाजी पालम पल्ले, विशाल साखरे, राम जाधव, लहू कारले, मंगेश सुरवसे, अजिंक्य माने, बसवराज मडोळे, बाळू सगर, अर्जुन सावंत, बाळू बुरुड, ग्रामपंचायत कर्मचारी, युवक, ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top