तुळजापुर : कुमार नाईकवाडी

शहरामध्ये वाढता कोरोना चा प्रादुर्भाव  होत असल्यामुळे तुळजापुर नगरपरिषद कार्यालयात कोरोना साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर दि.१७ शुक्रवार रोजी पञकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी पञकार परिषदेत बोलताना तुळजापुर चे तहसीलदार सौदागर तांदळे म्हणाले की, शहरामध्ये आलीकडच्या काळात कोरोना संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तुळजापुर शहरात दि.२२ ते २६ या कालावधीत सलग चार दिवस जनता कर्फ्यु करण्यात येणार असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना तहसीलदार सौदागर तांदळे म्हणाले की,  तुळजापुर शहरात वाढता कोरोना प्रादुर्भाव होत असल्याने  दि. २२ बुधवार पासुन ते दि.२६ रविवार पर्यत सलग चार दिवस जनता कर्फ्यु असणार आहे.  तरी नागरीकांनी विनाकारण घरा बाहेर पडु नये अशी विनंती करण्यात आली आहे.

 या चार दिवसाच्या कालावधीत फक्त हाँस्पीटल व क्लिनिक जवळील मेडीकल चालु असणार आहेत. तसेच दुध विक्रेते सकाळी ६ ते ९ या कालावधीत चालु राहतील. या चार दिवसाच्या जनता कर्फ्युत बँका, किराना दुकान ,भाजी मार्केट ,कृषी दुकाने,पेट्रोल पंप व शहरातील इतर दुकाने बंद राहणार आहेत. तरी तुळजापुर शहरातील नागरीकांनी विनाकारण रस्त्यावर फिरु नये जर रस्त्यावर विनाकारण फिरल्यास कडक कारवाई करण्यात येईल.तसेच या चार दिवसाच्या जनता कर्फ्यु कालावधीत शहराबाहेरील चेक पोस्ट वर कडक बंदोबस्त असणार आहे.कोणतीही व्यक्ती बाहेरून येणार नाही याची दक्षता घेणार आहेत. त्याचबरोबर शहरात कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे.शहरात पोलीस स्टेशन मार्फत पेट्रोलिंग असणार आहे तरी नागरीकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी विनाकारण फिरु नये.

तसेच मंगळवार पासुन धार्मिक श्रावन मास सुरु होत असल्यामुळे संसर्गजन्य कोरोना साथी च्या रोगामुळे तुळजापुर तालुक्यातील श्री महादेव मंदीरात श्री महादेवाचे दर्शन घेण्यासाठी कोणत्याही मंदीरात जाऊ नये.पुढील आदेश येईपर्यंत तालुक्यातील कोणतेही  मंदीर उघडणार नाहीत. शहरातील व तालुक्यातील श्री महादेव भक्तांनी व  नागरीकांनी आपल्या घरीच श्रावण माहिन्यात महादेवाची पुजा करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

या वेळी तुळजापुर नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी तुळजापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी नगरसेवक अमर मगर पंडितराव जगदाळे, विजय(आबा) कंदले, सुनील रोचकरी विशाल रोचकरी रणजीत इंगळे नानासाहेब लोंढे अभिजित कदम माऊली भोसले युवा नेते आनंद कदंले नगपरिषद अधिक्षक वैभव पाठक आदीसह न.प.कर्मचारी उपस्थित होते. 
 
Top