काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे दि‌. 30 जून रोजी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे  यांचे मार्गदर्शनानुसार येथील गायरान जमीनीवर महाश्रमदानातून  वृक्षारोपण करण्यासाठी  तहसील कार्यालय,पंचायत समिती, वनविभाग, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत तामलवाडी, जिल्हा परिषद शाळा,  सरस्वती विद्यालय तामलवाडी  यांच्या संयुक्त विद्यमाने 1300  खड्डे खोदण्यात आले. 


यावेळी श्रमदानासाठी  जिल्हयाचे खासदार  ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा परीषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, नगराध्यक्ष  सचिन रोचकरी, सभापती मुळे, जिल्हा परीषद सदस्या सुषमाताई शहाजी लोंढे, पंचायत समिती सदस्य  दत्तात्रय शिंदे, तालुका शिवसेना प्रमुख जगन्नाथ गवळी, उपसरपंच  दत्तात्रय वडणे, निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे ,आतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती कोकाटे, तहसीलदार सौदागर तांदळे, वनपरिक्षेत्र आधिकारी  ए. पी. पवार, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, मोहनराव राऊत, गटशिक्षणाधिकारी  अर्जुनराव जाधव, विस्तार अधिकारी  डॉ. वाय. के.चव्हाण, विस्तार अधिकारी मल्हारी माने, काळे, माळी, केंद्रप्रमुख, वनपरिमंडळ अधिकारी तुळजापूर आर.एम.शिंदे.सर्व वनरक्षक ,मुख्याध्यापक जाधव एस.के.,गोरे, तलाठी विठ्ठल शिंदे व  ग्रामसेवक  लाटकर यांचेसह सर्व तलाठी ग्रामसेवक शिक्षक  पत्रकार प्रभाकर जाधव, सतोंष मगर भीमा भुईरकर यांनी श्रमदान केले.

 
Top