तुळजापूर : कुमार नाईकवाडी
येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अनुवैजिक व दूरसंचार विभागातील प्राध्यापकांनी महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. शेखर जगदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑटोमॅटिक हॅन्ड सँनिटायझर सिस्टीम अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून  बनविला आहे. हा अँटोमँटिक हँड सँनिटायजर अल्प किमतीत बनविला असून याचा एका वेळेस सातशे व्यक्तींना लाभ घेता येतो.

हा ऑटोमॅटिक हँड सँनिटायझर एक फूट उंच व पाऊन फुट लांब असून हा सेन्सर बेस्ड सिस्टीम वर चालतो. यात दीड लिटर सँनीटायझर लिक्विड भरता येते. यात सातशे व्यक्ती आपले हात सँनिटायझर करू शकतात. यासाठी अत्याधुनिक मायक्रोकंट्रोलर बोर्ड , प्रॉक्सीमिटी सेंसर व इतर अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक साहित्याचा वापर करण्यात आला आहे. हा हँड सँनिटायझर अवघ्या पाच हजार रुपये किंमतीत बनविण्यात आला आहे. या ऑटोमॅटिक हॅन्ड सँनीटायझर मुळे व्यक्तींचा वेळ वाचण्यास मदत होते. तसेच यासाठी कोणतेही मनुष्यबळ लागत नाही त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता ही येत नाही. याकामी विभाग प्रमुख प्रा. डॉ. एन. डी. पेरगाड, डॉ. धनंजय खुमणे, विभाग प्रमुख प्रा. संजय सुरवसे, उपप्राचार्य प्रा.रवी मुदकणा यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले असे ऑटोमॅटिक  हॅन्ड सॅनिटायझर  सिस्टिमचे  निर्माते  प्रा.  संजय आखाडे यांनी सांगितले. 

सदरचा ऑटोमॅटिक हॅन्ड सँनिटायझर सिस्टीम श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडे व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे  यांच्याकडे भाविकांच्या वापरासाठी देण्यात आला आहे.  मंदिर  संस्थानच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे व सर्व विश्वस्त यांच्या प्रेरणेने ऑटोमॅटिक  हॅन्ड  सँनिटायझर बनविण्यात आला आहे असे प्राचार्य डॉ शेखर जगदे यांनी सांगितले.
 
Top