ताज्या घडामोडी


तुळजापूर : कुमार नाईकवाडी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पुण्य तुळजापूर नगरीत दिवसेंदिवस शहराचा विस्तार होत असून गेल्या दहा वर्षापूर्वी हद्दवाढीसाठी मंजुरी मिळाली होती. माञ नागरिकांना या भागात पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. यामुळे तेथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात  हाल होत आहे. या भागातील नागरीकांना अनेक संकटाला तोंड द्यावे लागत आहेत. या भागातील नागरीकांना  रस्ते, गटारी, रस्त्यावरील पथदिवे उपलब्ध नाहीत. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. गटारी नसल्यामुळे घरातील सांड पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे त्या भागात घाणीचे साम्राज्य होऊन रोगराईला निमंत्रक दिल्यासारखे चिञ पहावयास मिळत आहे.


नळदुर्ग रोडवरील मस्के वस्ती, आदित्य कॉलनी आदीसह हद्दवाढ भागात कुठल्याच प्रकारचे रस्ते नाहीत. सध्या पावसाळा चालु असल्याने त्या भागात चिखलाची मोठी दलदल झाली आहे. नागरीकांना चिखलातून घराकडे जाताना वाट काढावी लागत आहे. त्या भागात सुमारे साठ-सत्तर घरे आहेत. तरी अद्याप तेथे नागरिकांसाठी कुठल्याच रस्त्याची सोय केली नाही. यामुळे तेथील नागरिकांना चिखलातुन ये जा करावी लागत आहे. पावसाळ्यात चिखल मोठ्या प्रमाणावर झाल्याने या ठिकाणी  वाहनाना मोठी कसरत करावी लागत आहे.  काही वेळा वाहने त्या चिखलात फसत आहेत.  तरी नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ हद्दवाढ भागात नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी येथील नागरिकांमधुन होत आहे. या भागात राहणाऱ्या नागरीकांची मोठी गैर सोय होत असल्याने तेथील नागरीक हैराण झाले आहेत. तरी वेळीच न.प.प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
 
Top