जळकोट, दि. २४ : मेघराज किलजे
मौजे गुळहळ्ळी(ता.तुळजापूर) येथे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नळदुर्गच्या अंतर्गत वित्तीय समायोजन मेळावा सरपंच सौ. मिरा घोडके व ग्रामसेवक एम .सी .निलगार यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यामध्ये केंद्रातील शासकीय योजनेबद्दल माहिती देण्यात आली.
यामध्ये अटल पेंशन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा योजना, प्रधानमंत्री सुकन्या योजना,
प्रधानमंत्री जन-धन योजना या अंतर्गत खाते उघडणे, गावातील महिला बचत गटांना कर्ज वाटप अशा सर्व योजने बद्दल गावातील सर्व ग्रामस्थ,महिला व शेतकरी यांना माहिती देण्यात आली.यावेळी भारतीय स्टेट बँकेचे लातूरचे मुख्य प्रबंधक मिलिंद जरीफटके,
उपप्रबंधक मोहित आडके, नळदुर्ग शाखा व्यवस्थापक संतोष पाटिल, गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.