काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्र्वभूमीवर उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास (घाडगे) पाटील यांनी शनिवार दि.25 रोजी सायंकाळी 5:30 वाजता काटी गावास भेट दिली.
काटी येथे कोरोनाचे एकूण 14 रुग्ण आढळल्याने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, स्थानिक प्रशासनामार्फत याठिकाणी करण्यात आलेल्या वैद्यकीय उपाययोजनांची तसेच इतर बाबींचा आढावा घेतला.यावेळी उपसरपंच सुजित हंगरगेकर आणि ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे यांनी मागील चार महिन्यांपासून कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली होती.त्यास ग्रामस्थांनीही चांगला प्रतिसाद दिला असून बाहेरून आलेल्यांपासून कोरोनाचा शिरकाव झाल्याचे सांगून कोरोना रुग्णांची चेन ब्रेक करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने 16 जुलै ते 22 जुलै आणि 24 जुलै ते 30 जुलै या कालावधीत जनता कर्फ्यु पुकारला असल्याची माहिती दिली. कोरोना रुग्णांचा आढावा घेत असताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थितांना सोशल डिस्टंन्स ठेवण्यास सांगितले.
काटी येथील नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापन आणि वैद्यकीय सेवा संदर्भात सतर्क राहण्याच्या सुचना उपस्थित वैद्यकीय अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाला देऊन नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या वतीने नागरिकांना वाटप करण्यासाठी रोगप्रतिकारक अर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांच्या 700 बॉटल खासदार निंबाळकर यांच्या हस्ते ग्रामपंचायतकडे देण्यात आल्या. येथील ग्रामपंचायतच्या वतीने उपसरपंच सुजित हंगरगेकर, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, ग्रा.प. सदस्य मकरंद देशमुख, बाळासाहेब भाले, अनिल बनसोडे मार्फत खासदार ओमराजे निंबाळकर यांना निवेदन देऊन गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी खासदार फंडातून निधीची मागणी करण्यात आली. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते,तहसीलदार सौदागर तांदळे, चेअरमन विक्रमसिंह देशमुख, उपसरपंच सुजित हंगरगेकर, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव प्र. देशमुख,अशोक जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप मगर, सतीश सोमाणी, युवासेना शिवसेना तालुकाप्रमुख प्रतिक रोचकरी, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता लोंढे, डॉ.अजित राठोड, विस्तार अधिकारी वैरागे, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, तलाठी प्रशांत गुळवे, ग्रा.प. सदस्य मकरंद देशमुख, बाळासाहेब भाले, जितेंद्र गुंड,अनिल बनसोडे,करीम बेग, अहमद पठाण, पोलीस पाटील जामुवंत म्हेत्रे, सतीश देशमुख, सामाजिक कार्यकर्ते चंद्रोदन माळी (सावरगाव), बापुसाहेब नाईकवाडी, विक्रम नाईकवाडी, माजी सैनिक श्रीकांत गाटे, इजदानी बेग, नजीब बेग, संतोष उबाळे, नंदू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.