उस्मानाबाद, दि. 05 :
जिल्ह्यात बुधवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत जिल्ह्यात 78 रुग्णांची वाढ झाली असून जिल्हयात कोरोना बाधितांची संख्या 1691 वर पोहचली आहे. तर 539 रुग्ण बरे होवून घरी परतले असून 1093 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत जिल्हयात 59 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 78 कोरोना पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये उस्मानाबाद तालुक्यातील 22, तुळजापूर तालुका 13, उमरगा तालुका 27, परंडा तालुक्यातील 6, भूम 3 व वाशी तालुक्यातील 7 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांच्या वतीने शासकीय वैदयकीय महाविदयालय औरंगाबाद व डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद येथे एकूण 239 पाठविण्यात आले होते त्याचा अहवाल काल रात्री उशिरा प्राप्त झाला असुन तो खालीलप्रमाणे आहे.