जळकोट, दि. ५ : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील चौफेर कवी सुरज अंगुले यांची महाराष्ट्र माळी युवक संघटनेच्या तुळजापूर तालुका समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अंगुले यांचे समाजाबद्दल असलेले सामाजिक कार्य व त्यांची समाजाबद्दल काम करण्याची असलेली तळमळ लक्षात घेऊन माळी युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तायडे यांनी दखल घेऊन त्त्यांची तुळजापूर तालुका समन्वयकपदी नियुक्ती केली आहे.सुरजअंगुले हे एक उत्कृष्ट कवी असून समाजाच्या विविध विषयावर लेख लिहतात. एकनिष्ठेने व प्रामाणिक पणे आपले काम करेन व सदैव युवकांसाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांच्या या निवडी बद्दल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अभिलाष तायडे, साक्षी भोपळे व विविध संघटनेकडुन अभिनंदन होत आहे.