तुळजापुर : कुमार नाईकवाडी

अयोध्या येथील राम मंदीर भुमीपुजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या नगरीत बुधवार दि.५ ऑगष्ट रोजी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

तुळजापूर येथील ऐतिहासिक असलेल्या घाटशीळ येथील भगवान श्री राम यांचे पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पावन नगरीत या घाटशीळ पवित्र ठिकाणी अयोध्या येथील सपंन्न होत असलेल्या श्री राम मंदीराच्या पायाभरणी निमित्त तुळजापुर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते श्री प्रभु रामचंद्र यांच्या  घाटशिळावर असलेल्या पादुकांचे पुजन करुन  श्री रामा प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भा.ज.पा.चे तुळजापुर तालुकाध्यक्ष संतोष बोबडे,नगराध्यक्ष सचिन रोचकरी,नागेश नाईक,आनंद कंदले,गुलचंद व्यवहारे,सुहास साळुंके,विशाल रोचकरी,नारायण नन्नवरे आदीसह  श्री राम भक्त उपस्थित होते.


तसेच राम मंदीर भुमिजन सोहळ्याचे औचित्य साधुन येथील ऐतिहासिक असलेल्या आर्य चौक येथील श्री राम मंदीरात येथील श्रीरामाचे पारंपरिक पुजारी रत्नदीप राजाभाऊ भोसले यांच्या हस्ते श्री राम मंदीरात असलेल्या श्री रामाची पंचामृत अभिषेक घालुन यथा सांग पुजा करुन महाआरती करवुन पेढे वाटप करण्यात आले.

अयोध्या येथील राम मंदीर भुमीपुजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर  तुळजापुर शहरात संस्कार भारतीच्या वतीने शहरात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. बुधवारी दुपारी अयोध्या येथील होत असलेल्या श्री राम मंदीर भुमिपुजन सोहळा संपताच तुळजापुरात श्री राम भक्ताच्या वतीने शहरात फटाक्याची आतिष बाजी करुन पेढे, साखर वाटप करुन जल्लोष साजरा करण्यात आला.
 
Top