नळदुर्ग, दि. 05 : आज अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे भूमिपूजन सोहळा दिनी नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थ येथील श्रीराम मंदीरात नळदुर्ग शहर शिवसेनेच्या वतीने महारती करून मिठाई वाटून जल्लोष साजरा केला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा माजी उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण, नळदुर्ग शहर शहरप्रमुख संतोष पुदाले, उप तालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, उप शहरप्रमुख शाम कणकधर, नेताजी महाबोले, खंडू माने, सुनिल गव्हाणे आदीनी महारती करून फटाक्यांची आतिषबाजी केली.