नळदुर्ग, दि. ०५ : अयोध्या येथील श्रीराम जन्म भुमित श्री रामचंद्रांच्या भव्य मंदिराच्या भुमीपुजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. गेल्या अनेक दशकाचा प्रलंबित राममंदिराचा प्रश्न सुटला, राममंदिर निर्माणासाठी अनेक वर्ष संघर्ष करावा लागला .ज्यामध्ये कारसेवकांनी योगदान व बलिदान दिले. त्यामुळेच आज हा ऐतिहासिक दिवस पाहायला मिळत आहे.
नळदुर्ग येथुन अयोध्येला अनेकजण कारसेवक म्हणुन गेले होते. त्यापैकी शहरातील मल्लिनाथ गायकवाड, मुकुंद नाईक, यशवंत बेले, रंगनाथ गायकवाड, बाबू गायकवाड टेलर , राजेश कुलकर्णी, सुभाष कांबळे, राहुल वेदपाठक, मुकुंद वैद्य आदी कारसेवकांचा समावेश होतो. कारसेवकांच्या योगदानामुळे आज मंदिरनिर्माणाचे कार्य सुरू झाले. यामुळे कृतज्ञता व्यक्त करत उपस्थित कारसेवक मल्लिनाथ गायकवाड, मुकुंद नाईक, यशवंत बेले, रंगनाथ गायकवाड, बाबू गायकवाड टेलर यांचा सत्कार करण्यात आला .तसेच सुभाष कांबळे यांच्या घरी भेट देऊन किराणा साहित्याचे किट देण्यात आले. यावेळी पत्रकार विलास येडगे, माजी युवा सेना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर घोडके, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष श्रमीक पोतदार, भाजप सरचिटणीस विशाल डुकरे, ग्राहक स्वरंक्षक तुळजापूर तालुका प्रमुख राजेद्र जाधव, महेश वाघमारे आदि उपस्थित होते.