तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील कोरोनामुक्त झालेल्या तामलवाडी येथे एका ६० वर्षीय पुरूषाचा कोरोना अहवाल हा पाॅझीटीव्ह आला असल्याने तामलवाडीसह परीसरातील गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबधित परीसर सिल केला आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला असुन हा विषाणू हळूहळू ग्रामीण भागातही आपले हातपाय पसरू लागल्याचे दिसुन येत आहे.या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस,डाॅक्टर,नर्स, सफाई कामगार प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत.तरीही या विषाणुचा फैलाव वाढतच आहे. जुन नंतर पुन्हा दि.५ रोजी तामलवाडी येथील एका ६० वर्षीय पुरूषाचा कोरोना अहवाल हा पाॅझीटीव्ह आल्याने प्रशासन पुन्हा कामाला लागले असुन तामलवाडी येथील संबधित मंदीर परीसर प्रशासनाने शिल केला आहे.आरोग्य अधिकारी ,आरोग्य सेविका, ग्रामसेवक पी.एन.लाटकर,तलाठी विठ्ठल शिंदे,प्र.सरपंच दत्तात्रय वडणे, यानी मंदीर परीसराची पहाणी केली व संपूर्ण परीसर बंद करण्यात आला आहे. नागरीकांनी घराबाहेर न पडता आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या व कोणीही घाबरून जाऊ नका असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.कोरोना रूग्णांचा संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले असुन आणखी कोणाशी संपर्क झाला आहे याची चौकशी करण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.दरम्यान तामलवाडीचे ग्रामदैवत श्री विष्णु महादेव मंदीराजवळच रूग्ण आढळुन आल्याने व श्रावण महिना चालु असल्याने दर्शनासाठी येणार्या नागरीकांनी पुढील १४ दिवस कोणीही मंदीराकडे येऊ नये तसेच दाराबाहेरही पडु नये असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.तसेच आपल्याला कोरोनाशी लढा द्यायचा आहे रूग्णांशी नाही त्याकरिता प्रशासनाचे नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास आपण नक्कीच कोरोनावर मात करू शकतो असे संभाजी ब्रिगेड तसेच ब्रिक्स मानवाधिकार मिशनचे तालुकाध्यक्ष सर्जेराव गायकवाड यानी सांगितले.
तामलवाडी येथे कोरोना रूग्ण आढळुन आल्याने परीसरातील गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.परंतु नागरीकांनी घाबरून न जाता नियमांचे पालन करा ,मास्कचा वापर करा व घरीच रहा सुरक्षित रहा असे आवाहनही सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय काळे यानी तामलवाडीसह परीसरातील जनतेला केले आहे.