तुळजापूर, दि. 17 : कुमार नाईकवाडी

येथील शासकीय विश्रागृह (सर्कीट हाऊस) येथे उद्या मंगळवार दि. 18 ऑगस्ट रोजी गणोशोत्सवाच्या नियोजना संदर्भात तुळजापूर नगरपरिषद कार्यालय, तहसील कार्यालय व पोलीस ठाणे तुळजापूर बैठकीचे आयोजन करणत आले आहे. 

सदरील बैठक शुक्रवार दि. 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सर्कीट हाऊस येथे होणार असून बैठकीस शहरातील गणेश मंडळाचे प्रतिनिधी, सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी यांच्यासह गणेश भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी केले आहे.

 
Top