तुळजापुर : कुमार नाईकवाडी
येथील विठ्ठल मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने व मोजक्या लोकांच्या उपस्थित श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी व प्रमुख मान्यवराच्या हस्ते प्रथम श्री संत सेना महाराज यांच्या मुर्ती यथासांग पुजा करुन महा आरती करण्यात आली. या वेळी नगरसेवक सुनील रोचकरी, माजी नगरसेवक नारायण नन्नवरे, प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी, हभप खंडू महाराज गवळी समाजाचे ज्येष्ठ नेते भगवानराव डाके उपस्थित होते.
यावेळी समाजातील दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास हभप प्रकाश गवळी महाराज, अँड. जनक पाटील, रंगनाथ कावरे, बाळासाहेब धाकतोडे, मुकुंद शिंदे, सुरेश कावरे, संजय शिंदे, उदय पोफळे, श्रीकांत कावरे, प्रा. समीर माने, शिवाजी सुरवसे, नागेश डाके, नंदकिशोर डाके ,राहुल कावरे ,जयंत चौधरी , आहितोष राऊत ,सुनील राऊत, बाळासाहेब कावरे, प्रमोद चौधरी, चंद्रकांत बडोदकर, मुरली चौधरी, अमोल गोरे, राजू राऊत, आकाश चौधरी, प्रीतम डाके, सारंग कावरे, ओम कावरे आदीजण उपस्थित होते.