तुळजापुर : कुमार नाईकवाडी

संसर्गजन्य कोरोनामुळे प्रशासनाच्यावतीने शहरातील व्यापाऱ्याना वेळेचे बंधन घातल्यामुळे दिलेली वेळ वाढवुन देण्यात यावी, अशा प्रकारचे एक लेखी निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे व्यापार उद्योग चे आप्पासाहेब पवार यांनी दि.१७ सोमवार रोजी तहसीलदार यांना दिले आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले असून शहरातील व्यापारी वर्गाना महसुल प्रशासनाच्या वतीने सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत चालु ठेवण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे. पंरतु ही वेळ शहरातील व्यापाऱ्याना अपुरी पडत आहे. त्यामुळे महसुल प्रशासनाने सकाळी ९ ते सायंकाळी ५  पर्यत वेळ वाढवुन देण्यात यावी. तसेच सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे बाजार पेठामध्ये वेळ अपुरी पडत असल्याने गर्दी पडत आहे. तसेच येत्या शनिवारी गणेश चतुर्थी आहे. त्यादिवशी जनता कर्फ्यू शिथिल करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गोकुळ शिंदे, तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, व्यापारी उद्योगचे तालुकाध्यक्ष आपासाहेब पवार, धनंजय पाटील, शहराध्यक्ष अमर चोपदार, बबन गावडे, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष, सचिन कदम, फिरोज पठाण, युवक शहर शहराध्यक्ष शरद जगदाळे, संदीप गंगणे, शशी नवले, तोफिक शेख, मकसूद भाई, दिनेश शिरसागर, समर्थ पैलवान, आरिफ बागवान यांच्यासह पदाधिकारी, व्यापारी उपस्थित होते.




 
Top