उस्मानाबाद, दि. 17 : जिल्हयाचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर गत विधानसभा निवडणुकीच्यावेळी चाकू हल्ला करणारा आरोपी अजिंक्य टेकाळे हा पोलीसांना चकवा देवून पळून गेल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. आज सोमवार दि. 17 ऑगस्ट रोजी अजिंक्य यास तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र रुग्णालयातून तात्पुरत्या जेल मध्ये आल्यानंतर तो पसार झाला आहे.
गत विधानसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर हे पडोळी-नायगाव येथे प्रचार करत होते. त्यावेळी गर्दीतून आलेल्या एका तरुणाने हात मिळवत त्यांच्या पोटावर दुसऱ्या हाताने चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला होता. पण ओमराजेंच्या घड्याळावर चाकूचा वार बसल्याने त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही. त्यानंतर पोलीसांनी आरोपी अजिंक्य टेकाळे यास अटक केले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी रोजी वैद्यकीय तपासणीसाठी आरोपी संजय टेकाळे यास जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र रुग्णालयातून तात्पुरत्या जेल मध्ये आल्यानंतर जेल पोलिसांच्या हातावर तुरी देऊन टेकाळे हा पसार झाला आहे.