तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
सार्वजनिक गणेशोत्सव संदर्भात सुरतगाव ता तुळजापुर येथे दि.१७ रोजी तामलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय काळे यानी महत्वाची बैठक बोलावली होती.या बैठकीमध्ये यंदाचा गणेशोत्सव हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करावा असे आवाहन सपोनि दत्तात्रय काळे यानी ग्रामस्थांना केले.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून साध्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन तामलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय काळे यानी सुरतगाव येथील बैठकीदरम्यान बोलताना केले आहे.प्रथमतः नुतन सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय काळे व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे यांचा सुरतगाव ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी गणेशोत्सवादरम्यान कोणीही गर्दी करू नये,प्रशासनाच्या सर्व नियमांचे,सुचनांचे नागरीकांनी पालन करावे,मिरवणुक न काढता गणेशोत्सव साधेपणाने साजरा करून प्रशासनास सहकार्य करावे अशा सुचनाही सपोनि काळे यानी बैठकीदरम्यान बोलताना दिल्या आहेत.
या बैठकीस उपसरपंच विठ्ठल गुंड,विजय देवकर,राम गुंड,पोलिस पाटील प्रविण कुंभार,बाबुराव गुंड,अनिल गुंड,पांडुरंग गुंड,बालाजी देवकर गणेश धोत्रे,महेश नकाते,सुरज माळी,नागेश मगर,सौदागर गुंड,राजकुमार गुंड,बिट अमंलदार गोरोबा गाढवे,राठोड,तसेच पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.