तुळजापुर : कुमार नाईकवाडी

येथील आनंद कंदले मिञ मंडळाच्या वतीने सोमवार दि. १७  रोजी तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापुर शहरातील 25 धाडसी सर्प मित्रांना  1 लाख 25 हजाराचे विमा कवच देऊन सत्कार करण्यात आला. यामधे जखमी झाल्यास 25 हजाराचा दवाखाना खर्च व जिवितहानी झाल्यास 1 लाख परिवाराला मिळतील. 

विमा कवचच्या प्रमाणपञाचे वाटप नगराध्यक्ष सचिन रोचकरी, युवा नेते विनोद गंगणे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बोबडे यांच्या हस्ते सर्प मिञाना करण्यात आले. या वेळी नगरसेवक विजय कंदले, पंडितराव जगदाळे, विशाल रोचकरी, सुहास साळुंके, अविनाश गंगणे, नागेश नाईक, शिवाजी बोधले, रत्नदिप भोसले, किशोर दरेकर, रामराजु जाधव, दत्ता राठोड, अनंत मोगरकर यांच्यासह आनंद दादा कंदले मित्र परिवार, सहकारी उपस्थित होते.



 
Top