काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे  रविवार  दि.16  रोजी सायंकाळी आलेल्या अहवालामध्ये एक 70 वर्षीय वृध्द महिला कोरोनाबाधित झाल्याचा अहवाल आला असून पेशंटच्या संपर्कातील चारजणांपैकी एक जणास तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात तर तिघांना होम कोरोंनटाईन करणात आले आहे. त्यामुळे आता काटी येथील रुग्णांची संख्या आता 36 वर गेली असून 36 रुग्णांपैकी 34 रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत. 

सोमवार दि. 17 रोजी सकाळी कोरोनाबाधित रुग्णाच्या घराशेजारील हंगरकर गल्लीतील परिसर ग्रामविकास अधिकारी लक्ष्मीकांत सुरवसे, तलाठी प्रशांत गुळवे, आरोग्य वर्धिनी उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अजित राठोड यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत परिसर सील केला आहे. 


 
Top