अणदूर, दि. 18 : हिंदू संस्कृती मध्ये मुक्या जनावरांचा मोठा सण बैल पोळा कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भाव मुळे अणदूर व परिसरात साधेपणाने व घरोघरी मोठ्या उत्साहlत साजरा करण्यात आला. तसेच माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या घरीही बैलपाळा सण साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.

मुक्या जनावरांना आपला अन्नदाता मानणारा बळीराजा वर्षातून एक दिवस त्यांचे पूजन करतो, त्यांना गोडधोड खायला घालतो तो सण म्हणजेच बैलपोळा. श्रावणाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे पिठोरी अमावस्येला. हा सण दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो बैलांना आंघोळ घालून स्वछ करणे, त्यांची रंग रंगोटी करून त्यांची पूजा करून पुरण पोळीचा नैवद्य दाखविला जातो, श्रावण महिन्यात सणांची रेलचेल असते व त्या सणांचा शेवट हा बैलपोळा असतो वर्षभर राब राब राबणाऱ्या या जनावरांना एक दिवस त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न बळी राजा पोळ्यादिवसी करीत असतो कधीच न थकता, कधीच नाही न म्हणता, दिला तसा चारा खाऊन, मालंकासोबत सतत, अहोरात्र कष्ट करण्याची तयारी,बैलाची असते

आणि हो, मालकाला काय पिकलं, किती पिकलं, कस विकलं, नफा,तोटा अगदी कशा कशाची हि पर्वा न करता फक्त कष्ट, कष्ट करणारा मुका प्राणी बैल असतो तांत्रिक शेती चा विकास करण्यासाठी तमाम मानवंजातीच पोट भरणारा हा प्राणी असतो.

पोळा जरी निमित्त असलं तरी या प्राण्यांचा आदर,सन्मान आणि आदर्श ठेवण्याचा दिवस असतो. असा हा अनोखा सण बैलपोळा अणदूर व परिसरात साधेपणाने परंपरागत पद्धतीने घरच्या घरीच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन बैलांच्या वाजत गाजत मिरवणूक टाळण्यात आल्या. एकंदरीतच इतर सणाप्रमाणे बैलपोळ्यावर कोरोना रोगाचे सावट मोठ्या प्रमाणावर जाणवले.

 
Top