तुळजापूर, दि. 18 : तिर्थक्षेत्र तुळजापुर येथे कोरोना काळात होत असलेल्या अवैध गुटखा विक्री करणा-यांवर कार्यवाही करा, अशा मागणीचे लेखी निवेदन भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्यावतीने तुळजापूर तहसिलदार यांना मंगळवार दि. 18 रोजी देण्यात आले आहे. दरम्यान, भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या गेल्या तीन महिन्यात पाचव्यांदा निवेदन देण्यात आले आहे.
आज तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुळजापुर शहरात संसर्गजन्य कोरोना महामारीच्या काळात अवैधरित्या गुटखा विक्री केली जात असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे सांगून पुढे म्हटले आहे की, याबाबत पोलीस प्रशासन, अन्न व भेसळ प्रशासनाला तसेच तहसील कार्यालयास वारंवार निवेदन देवूनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. तात्काळ तुळजापुर शहरात होणारी अवैध करणा-यांवर कडक कार्यवाही करा, अन्यथा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष विजय भोसले, अजिंक्य हंगरगेकर आदींच्या स्वाक्ष-या आहेत.