चिवरी, दि. 18 : तुळजापूर तालुक्यातील चिवरी गावास  जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी भेट देऊन त्याठिकाणी असलेल्या सोयी-सुविधा बद्दल चौकशी केली. तसेच ग्रामस्थांना आरोग्याच्या सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाने व प्रशासनाने प्रयत्न करावे, असे सूचित केले.

जि.प. अध्यक्षा कांबळे यांनी चिवरी गावातील ग्रामस्थांशी चर्चा करून शासनाने घालून दिलेल्या अटी व समाजिक अंतर, तोंडाला मास्क बांधून घराबाहेर पडणे, याबाबत आवाहन केले.

यावेळी गट विकास अधिकारी डॉक्टर प्रशांत मरोड, उपसभापती सरडे, सरपंच अशोक घोडके, उपसरपंच बालाजी पाटील, पोलीस पाटील रुपेश बिराजदार, ग्रामसेवक गोरोबा गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राजीव कचुवाई, नरसिंग झिंगरे, अंगणवाडी सेविका अनिता बिराजदार, आशा कार्यकर्त्या अर्चना राजमाने, कांबळे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.


 
Top