अणदुर, दि. 18 : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील हॅलो मेडिकल फौंडेशन संस्थेच्या वतीने कार्यक्षेत्रातील 70 गावामधून बैलपोळा हा सण साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला
यावर्षी बैलपोळा सणा वर कोरोना प्रादुर्भावाचे संकट आहे. अश्याप्रसंगी सगळीकडे भीतीचे वातावरण असताना हॅलो संस्थेच्या वतीने पुरुष प्रेरक, महिला प्रेरीका व मानसमित्र यांनी कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात बैलपोळ्यानिमित्त रंगरंगोटी केलेल्या बैलांवर कोरोना विषयी जनजागृती करणारी म्हणी लिहून संदेश देण्याचा प्रयत्न केला.
याप्रसंगी कोरोना मुळे घाबरून जाऊ नका.. पण नियम पाळणे, वेळोवेळी आरोग्यतपासणी करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, नियमित मास्क वापरणे, हॅन्ड वाँश व सॅनिटायझर चा नियमित वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे याविषयी जनजागृती करणारे म्हणी बैलांच्या पाठीवर लिहून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला हे उपक्रम राबविण्यात कार्यक्षेत्रातील ७० गावातील ९० प्रेरक, प्रेरीका व मानसमित्र यांनी पुढाकार घेतला असून त्यांना याकामात तुळजापूर तालुक्यात बसवराज नरे तर लोहारा तालुक्यात सतीश कदम यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या उपक्रमास लोहारा व तुळजापूर तालुक्यातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.