नळदुर्ग, दि. 11 : महावितरणचे वीज बील तीन ते चार महिन्याचे एकत्रित आले आहे. अशा परिस्थितीत वीज बिलात वाढीव बील अथवा सक्तीने वसूली व वीज पुरवठा खंडीत करीत असतील तर नळदुर्ग शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांशी नागरीकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संसर्गजन्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या मार्च महिन्यापासुन लॉकडाउन होते. त्यामुळे विजेचे बिल एकदाच ३-४ महिन्याचे आले आहे. लॉकडाउनच्या परिस्थितीत शेतकरी, व्यापारी, नोकरी, उद्योग, व्यवसाय यावर आर्थिकदृष्टया मोठा परिणाम झाला आहे. सामान्य जनतेला हे विज बील हप्त्यामध्ये करून द्यावे व विज बिल भरण्याअभावी त्यांचे विज कनेक्शन तोड़ू नये अशी मागणी आम्ही शहर मनसेच्या वतीने केली आहे. तरी सर्वसामान्य नागरीकांना मिळालेल्या विज बिलात वाढीव बिल अथवा सक्तीने वसूली करीत असतील. तसेच आपला विज पुरवठा खंडित करत असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांशी संपर्क साधावा, असे आवाहन मनसेचे नळदुर्ग शहराध्यक्ष अलीम शेख, सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांनी केले आहे.