वागदरी : एस.के.गायकवाड

तथागत भगवान गौतम बुद्धांचा प्रज्ञा, शील, करुणेचा उपदेश अंगीकृत करून त्या उपदेशाचे प्रत्यक्ष अनुकरण करत वंचित बहुजन आघाडीचे उस्मानाबाद जिल्हा नेते तथा भारिप बहुजन महासंघाचे माजी जिल्हा अध्यक्ष मिलिंद रोकडे आणि त्यांच्या सहका-याच्या पुढाका-यातून वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, प्रबुध्द कुष्ठरोग निर्मूलन व पुनर्वसन संस्था कामटा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्था उदगीर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व हितचिंक दानशूर व्यक्ती आदींच्या सहकार्याने कोरोना विषाणू महामारीच्या काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन, संचार बंदी, साथरोग निर्मूलन कायदा, जिल्हा बंदी असा कठीण काळात हजारो गरजू गरिब कुटुंबाना मार्च ते आँगस्ट २०२० पर्यंत  अन्न धान्याचे किट वाटप करून मानवतेची नाळ अखंडपणे जोडणारा एक अनोखा उपक्रम उस्मानाबाद जिल्ह्यात राबवून समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण करून कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचे काम मिलिंद रोकडे करताना दिसत आहे.

      

शालेय आणि महाविद्यालयिन जिवनातच त्यांना समाजिक कार्याची आवड निर्माण झाली. मूळात त्याच्या आई वडिलांनाच बुद्ध- फूले-शाहु -आंबेडकर या महामानवांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्याचीआवड आहे. वडील आरोग्य सेवेत नौकरीस होते. आपली नौकरी आणि कुटुंब सांभाळत मिळालेला वेळ ते धम्म कार्यास देत असत .त्यामुळे मिलिंद रोकडे यांना महामानवांच्या विचारांचे बाळकडू घरीच मिळाले. महाविद्यालयिन उच्च शिक्षण पूर्ण करून ते पूर्णवेळ श्रध्देय अँड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक निष्ठपणे सामाजिक, राजकीय, आणि धार्मिक कार्यात ते सक्रिय आहेत. अँड. प्रकाश आंबेडकरांचे निकटवर्तीय कार्यकर्ते म्हणून सर्वत्र त्यांची ओळख आहे.

    

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मानवी साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात दि.२३ मार्च २०२० पासून लाँकडाऊन, संचार बंदी, जिल्हा बंदी लागू केलेली आहे. लाँकडाऊन पूकरण्यात आल्यनंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी लाँडाऊन काळात गरिब गरजू कुटुंबाना वंचित आघाडीच्या वतीने सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मिलिंद रोकडे आणि त्यांच्या टिमने आजतागायत म्हणजे १२२ दिवसांत २३३२ गरजू कुटुंबाना अन्न धान्याचे किट वाटप केले. दरम्यानच्या काळात त्यांनी कधी मान्यवरांच्या हस्ते, कधी यूवा कार्यकर्त्यांच्या हस्ते,तर कधी विद्यार्थ्यांच्या हस्ते सदर किटचे वाटप करुन जेष्ठांचा मानसन्मान, युवक,विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन हा उपक्रम राबवित आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यानी सांगितले.

   एकंदरीत त्यांच्या या उपक्रमाचा विचार केला असता असे म्हणता येईल की,कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मानवी साकळी थोडण्यासाठी लाँडाऊन करणे परिस्थिती नुसार काळची गजर आहे. हे जरी खरे असले तरी असा महाभयंकर काळात मानवतेची साकळी तुटू न देण्याची खबरदारी वंचित आघाडीचे जिल्हा नेते मिलिंद रोकडे आणि त्यांच्या टिमने घेतली आहे.

 
Top