तुळजापूर, दि. 17 :  जागतिक महामारी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच गावक-यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ताकविकी गावचे सुपुत्र डॉ. भाऊराव यादव व डॉ. स्नेहल यादव या डॉक्टर  दाम्पत्याने पुढाकार घेतला आहे. यादव डॉक्टर दाम्पत्याचा वतीने  "अर्सेनिक अल्बम ३०" या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी कोरोना विषयी जनजागृती करणार्या माहितीपत्रकाचे सुध्दा वाटप  करण्यात आले. 

यादव हॉस्पिटल लातूर आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक प्रतिष्ठान लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात स्वंयसेवकामार्फत गावातील  प्रत्येक घरोघरी अर्सेनिक अल्बम ३० गोळ्या तसेच कोरोना आजारावरील माहिती पत्रक वाटप करण्यात आले.

याप्रसंगी डॉ.भाऊराव यादव, अहेमद पठाण, सज्जन ठाकूर, सोमनाथ निटूरे, डॉ. रोहित यादव, हनुमंत यादव, जमीर शेख, रमेश यादव, राहुल माने, सुरेश पवार, गणेश यादव, महेश राजपूत, सचिन जाधव, रामेश्वर गायकवाड आदीसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.  

 
Top