उस्मानाबाद : महेश पाटील

ग्रामसंस्कृतीमध्ये बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैलपाळा. बहुतांश भागात  दुष्काळाच्या सावटाखाली बैलपोळा सण साध्या पद्धतीत साजरा करण्यात आला.

शेतकरी बांधवांचा कुटूंबाचा प्रति एक सदस्य असलेल्या पशुधनाचा बैलपोळा हा सण कृतज्ञता व्यक्त करण्याचा ग्रामसंस्कृतीचा हा सण असून बैलाची आरासपूजन करण्याचा हा सण प्रतिवर्षी अति उत्साहाने साजरा करतो. पण यावर्षी संसर्गजन्य कोरोना व दुष्काळी परिस्थितीमुळे साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. बैलांच्या सजावटीमध्ये झूल, गोंडे, पिवडी, फुगे, बेगड, शेब्या, तोरणे या सजावटीत साहित्याचे म्हणावे तसे पाहण्यात आले नाही. दुकानाची तोरणेच सजलेली दिसून आली. 

पूर्वी घरासमोर गोठ्यात गाय, बैल, म्हैस असायची. त्यांचा निकष असा होत की जनावर दारात असले की त्या घरात धन वाढायचे. आता पशुधन खूप कमी प्रमाणात दिसत आहे. शेतकरी बांधवासमोर पशुधन जगविण्याचे खूप मोठे संकट आहे. निर्सगाचा लहरीपणामुळे पशुधन जगविण्याचे संकट असल्याचे चिञण गडदपणे ग्रामिण भागातही दिसत आहे. या कालातरांने खूप अडचणी समोर आहेत.

पोळा सण म्हटले की वरूणराजाचे ही बैलांना आशिर्वाद देण्यासाठी रिमझिम बरसात होत असे पण त्यातच पवसाची रिमझिम न झाल्याचे पोळा सणात दुष्काळाचे सावट असल्याचे प्रत्यक्षात दिसून आले. पाऊस नसल्याने शेतकरी बांधवांना पशुधन जगविणे म्हणजे कुटूंब जगविण्यासारखे आहे. महाराष्ट्रातील बहूतांश भागातील पाऊस नसलेल्या भागात दुष्काळाचे सावट हटून शेती, तलाव,नद्या पाणीदार कधी होती या गोष्टी ची आतूरता शेतकरी बांधवाला लागली आहे.

 

 
Top