वागदरी : एस.के.गायकवाड 

वर्षभर आपल्या शेतात काबाडकष्ट करून शेतकऱ्याना अन्न धान्याच्या रुपात मोत्याच्या रासीचे पोते भरभरून देणाऱ्या बैलजोडीस वर्षांतून एकदा सजावट करुन वाजत गाजत बैलांची पुजा करून आनंदी वातावरणात मिरवणूक काढून साजरा करण्यात येणारा बैलपोळा हा सण यंदा कोरोनाच्या सावटाखाली तुळजापूर तालुक्यातील वागदरी व परिसरात मिरवणूकविनाच साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव शहरीभागाबरोबरच ग्रामीण भागात ही वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परंपरेनुसार साजरा करण्यात येणारा बैलपोळा या सणानिमित्ताने मिरवणूका काढणे, ढोल तास, बँजो,वाजविणे या बाबींवर शासनाने बंदी घातली आहे. शासनाच्या या आदेशाचे पालन करत वागदरी व परिसरातील शेकऱ्यानी जागेवरच घरासमोर, अंगणातच आपल्या बैलजोडीची, जनावरांची सजावट करून मनोभावे त्यांची पूजा करून मिरवणूक न काढताच बैलपोळा सण साजरा केला.


 

 
Top