तुळजापुर : कुमार नाईकवाडी 

वर्षभर शेतात काबाड कष्ट करुन बळीराजाला साथ देणाऱ्या बैलाचे पुजन करण्यात येणारा "बैल पोळा" सणावर यंदा संसर्गजन्य कोरोनाच्या तुळजापुरात साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. 

मंगळवार दि. १८ मंगळवार ऑगस्ट रोजी श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात बैल पोळा सण भक्ती भावाने साजरा करण्यात आला. श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत असलेल्या महंत तुकोजीबुवा, महंत चिलोजीबुवा यांच्या मठाधिशाच्या शेतातील बैलाची व छञपती कोल्हापूर संस्थान यांच्या मानाच्या बैलाची पारंपरिक पद्धतीने श्री तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यातील चोपदार दरवाजा जवळ नेहुन बैलाची यथा सांग पुजा करण्यात आली. सदरील परंपरा ही शेकडा  वर्षापासून आजतागायत चालु आहे. 


या दोन्ही मठाधिशाच्या व कोल्हापूर संस्थानच्या बैलांच्या जोड्याची सायंकाळी ५ वाजता श्री तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यातील श्री चोपदार दरवाजाजवळ  बैलाच्या जोड्याची श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान चे धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, महंत तुकोजीबुवा आदीसह महंताच्या  हस्ते श्री देवीजी च्या चरणा वरील हळंद कुंकु लावुन विधिवत यथा सांग पुजा करुन महाआरती करवुन पुरण पोळीचा नैवद्य देण्यात आला. 

यावेळी श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत वाकोजीबुवा, महंत हमरोजी बुवा, महंत चिलोजीबुवा, मुख्य भोपे पुजारी सागर राजाभाऊ, सोनबा कदम, प्रदुमन्य नानासाहेब कदम, निखील पाटील, पाळीकर पुजारी सुजीत सुरेश शिंदे, मंदीर संस्थानचे कर्मचारी संकेत वाघे, सेवेदार अंबादास औटी आदीजण उपस्थित होते. शहरात नागरीकांनी साध्या पद्धतीने बैल पोळा सण साजरा केला.



 
Top