नळदुर्ग, दि. 15 :
शनिवार दि. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी नळदुर्ग शहरातील व्यापारी व दुकानातील कामगारांची असे 117 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 4 जण पॉजिटीव्ह आढळून आले. सदरील तपासणी करुन घेण्याचे आवाहन नगरपालिकेच्यावतीने करण्यात आले होते.
नळदुर्ग येथिल तुळजापूर रोडलगत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृहात शनिवारी व्यापा-यांची प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जानराव व आरोग्य कर्मचा-यांनी कोरोना टेस्ट केली. दरम्यान, 117 पैकी 4 जण पॉजिटीव्ह आढळले असून त्यापैकी एक महिला व तीन पुरुष आहेत. हे रुग्ण व्यासनगर, भवानीगर, शास्त्री चौक या भागातील असल्याचे डॉ. जानराव यांनी तुळजापूर लाईव्ह शी बोलताना सांगितले.
कोरोना टेस्ट करीता व्यापारी व दुकानातील कामगारांना नगरपालिकेचे कर्मचारी, व्यापारी संघटनेने व बागवान समाजाचे अध्यक्ष गौस बागवान यांनी सहकार्य केले.
यावेळी मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, कार्यालयीन अधिक्षक लक्ष्मण कुंभार, अजय काकडे, मुनीर शेख, खलील शेख, फरमान पठाण, सुरज गायकवाड, हरीभाऊ पुंद, नितीन पवार, वाल्मिक खारवे, सुशांत डुकरे, सुशांत भालेराव, सुनिल देडे, अनंत खारवे, खंडू नागणे, खंडू शिंदे, फुलचंद सुरवसे यांच्यासह कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.