उस्मानाबाद, दि. 15 : गेल्या सहा महिन्यांपासून प्राथमिक शिक्षक संघटना व सर्व बीएससी उत्तीर्ण विज्ञान विषय शिक्षकांच्या पाठपुराव्यास अखेर यश आले असून जिल्हयातील पात्र 70 विज्ञान विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दि. 14 ऑगस्ट रोजी मुख्य मंजूर केले आहे. या निर्णयाचे शिक्षकांतुन स्वागत होत आहे.

उस्मानाबाद जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे काही महिन्यांपूर्वी बीएससी पात्र विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देण्याची मागणी शिक्षक संघटनेने केली होती. त्या प्रस्तावावर मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी स्वाक्षरी केली.

त्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, जि.प. अध्यक्षा  अस्मिता कांबळे उपाध्यक्ष धनंजय सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकरी तुबाकले, तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, विद्यमान प्राथमिक शिक्षणाधिकारी रामलिंग काळे, प्रशासन अधिकारी गोवर्धन लांडगे यांच्यासह शिक्षण विभागातील सर्वांचे शिक्षक संघटनेकडून आभार व्यक्त करण्यात आले आहे. 


 
Top