उमरगा : लक्ष्मण पवार

उमरगा तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. संशयित व्यक्ती पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे ठरवण्यासाठी त्या व्यक्तीच्या घशातील स्त्राव तपासला जातो. तेच स्त्राव घेण्याचे कठीण आणि जोखमीचे काम गेल्या काही दिवसापासून उमरगा उप जिल्हा रुग्णालयातील ही टीम कार्यरत आहे. सलाम त्यांचा कार्याला..

किट अंगावर घालून वावरतानाच खरं तर शरीरातील एनर्जी संपून जाते. त्यात ज्याचा स्वाब घ्यायचा असतो, तो रुग्ण कोरोनाच्या भीतीने अगोदरच घाबरलेला असतो. प्रथम त्याच्या मनातील भीती घालवावी लागते व त्यानंतर त्याला संपूर्ण प्रोसिजर समजावून सांगावी लागते. नंतरच त्याचा स्वाब घ्यावा लागतो. हा ‘स्वाब’ नाकातून घ्यावा लागतो. घशाचा नमुना देखील घेऊ शकतो. हा स्वाब घेताना रुग्ण अचानक खोकला वा शिकंला, तर अचानकपणे त्याच्या तोंडातून व नाकातून विषाणू बाहेर पडू शकतात. पेशंट अत्यवस्थ असेल वा लहान बाळ असेल, तर स्वाब घेताना अधिक जोखीम पत्करावी लागते. कारण रुग्णाच्या सर्वात जास्त जवळ हेच योद्धे असतात. 

जगभर थैमान घातलेल्या कोरोना रुग्णांवर उपचार करताना अनेक डॉक्टरना देखील आपला प्राण गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. मानवजात संपवायला निघालेला अदृश शत्रू म्हणून ज्याला सगळं जग ओळखू लागलंय, त्या कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील टीम प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी विकास सूर्यवंशी व गिरीश कडगंजी, सुरवसे साहेब, पिंटू वाघमारे, संजय शिंदे शिपाई माळवतकर कोरोना योद्धा  टीम तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर साळुंखे व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बडे साहेब यांच्या मार्गदर्शना नुसार उमरगा शहरात टीम कार्यरत आहे.

 यांनी  कोरोना संशयित व कोरोना बाधितांचे स्वाब घेण्याची सर्वाधिक जोखमीची जबाबदारी त्यांनी स्वीकारलीय. आतापर्यंत हजारो रुग्णांचे स्वाब त्यांनी घेत ही जोखमीची जबाबदारी अगदी हसत-हसत स्वीकारली. त्यांना माहीत आहे की, थोडी जरी कुठे चूक झाली, तरी आपले प्राण जोखमीत आहेत. पण मोठय़ा धैर्याने ते ही जबाबदारी पार पाडत आहेत.सलाम त्यांच्या कार्याला सलाम. त्या कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील टीम प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी गिरीश कडगंजी, विकास सुर्यवंशी, मिलींद सुरवसे, संजय शिंदे, रुंजी वाघमारे कोरोना योद्धा टीम तालुका आरोग्य अधिकारी गट विकास अधिकारी के.के.कांबळे, सहाय्यक गट विकास अधिकारी डॉ. अमित कदम, डॉक्टर अविनाश साळुंखे व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बडे  यांच्या मार्गदर्शना नुसार उमरगा शहरात टीम कार्यरत आहे.

 
Top