वागदरी : एस.के.गायकवाड 

दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे अवचित साधून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तुळजापूर तालुका शाखेच्या वतीने मान्यवर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार संघाच्या सदस्यांना मान्यवरांच्याहस्ते हेल्मेटचे वाटप करण्यात आले.

 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तुळजापूर तालूका शाखेच्या वतीने स्वतंत्र दिनाचे अवचित साधून नळदुर्ग येथील पत्रकार संघाच्या संपर्क कार्यालयात पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष सुनील बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

  यावेळी प्रमुख अथिती म्हणून उपस्थित नळदुर्ग पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी स.पो.नि.सुधिर मोठे, स.पो.नि.अमित मस्के,प्रा.सचिन लोखंडे आदिंचा सत्कार करून त्यांच्या हस्ते पत्रकार संघाच्या सदस्याना राज्य कार्यकारणीच्या वतीने देण्यात येणारे हेल्मेटचे वाटप करण्यात आले .

    यावेळी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अरूण लोखंडे, उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड, सचिव एस.के. गायकवाड, तालुका कार्यकारणी सदस्य शिवशंकर तिळगुळे,बालाजी गायकवाड, सचिन तोग्गी,शाम नागीले,सचिन गायकवाड,आदी उपस्थित होते.

 
Top