तुळजापूर, दि. 15 : येथील नगरसेविका भारतीताई नारायणराजे गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क व सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले.
तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विनोद पिटु गंगणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका भारतीताई नारायणराजे गवळी यांचा वाढदिवसानिमित्त 500 सॅनिटायझर बाटलीचे व 700 मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी भरत आण्णा सोनवणे, प्रकाश मगर, नगरसेवक शहाजी जाधव, संतोष पवार, गणेश धुरगुडे, भिमा जवजाळ, संभाजी गायकवाड, गणेश भिंगारे यांच्यासह कै. नारायणराजे गवळी मिञ परिवार उपस्थित होते.
