काटी : उमाजी गायकवाड


 महाराष्ट्र राज्यातील पंचायत समिती सदस्यांना दहा टक्के निधी वापरण्याचा अधिकार मिळावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सदस्यांना एकत्रित करून लढा उभारून लढा यशस्वी केल्याबद्दल तुळजापूर पंचायत समितीचे सदस्य दत्ता शिंदे यांचा आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


 पंचायत समिती सदस्यांना विकास निधी खर्च करण्यासाठी दहा टक्के निधी मिळाल्याबद्दल सन्मान म्हणून आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना  सत्कारमूर्ती शिंदे म्हणाले की, आ. राणा दादा पाटील यांनी केलेला सन्मान हा माझा एकट्याचा नसून आंदोलनात सहभागी महाराष्ट्रातील सर्व पंचायत समिती सदस्यांचा आहे ज्यांनी प्रत्येक वेळेस आंदोलनात सहभागी होऊन लढा दिला. मी सर्वांचा आभारी आहे. यापुढेही पंचायत समिती सदस्य यांच्या मागणीसाठी पंचायत समिती सदस्य तथा प्रवर्तक गजेंद्र जाधव, शिरीष पटेल, पुजाताई मोरे आदी पंचायत समिती सदस्यांच्या साथीने लढा सुरू ठेवणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.        

      

  यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील, उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. अस्मिताई कांबळे, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, पंचायत समिती सभापती मुळे, उपसभापती गोरे, सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

 
Top