उस्मानाबाद, दि. 19 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांची नांदेड येथे बदली झाली आहे. त्यानिमित्त आडे यांना अधिकारी व कर्मचा-यांच्या वतीने निरोप देण्यात आला. यावेळी सहाय्यक नियोजन अधिकारी श्रीकांत कुण्टला यांच्यासह कर्मचा-यांनी सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुण्टला, श्रीमती प्रीतम कुण्टला,  एस.एम. बाबशेट्टी, अमोल वडगणे, एम.एल. डोके, एम.पी. ठाकुर, आर.एन. पडवळ, विजय पाटील, अमर शिंदे, शिलवंत फंड, सचिन बागल, अगतराव सानप आदीजण उपस्थित होते.

 
Top