वागदरी : एस.के. गायकवाड
पुणे येथील भिमाकोरेगाव प्रकरणातील मुख्य फिर्यादी व साक्षीदार असलेले दिवंगत भिमसैनिक सुरेश सगट याना नळदुर्ग ता.तुळजापूर येथे रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आ) च्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली वहाण्यात आली.
दि. १ जानेवारी २०१८ रोजी भिमाकोरेगाव पुणे येथील विजयी स्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या भिमसैनिकावर हल्ला करण्यात आला होता. या घटनेची न्यायालयीन लढाई लढणारे स्वाभिमानी भिमसैनिक व या घटनेचे मुख्य फिर्यादी आणि साक्षीदार असलेले सुरेश सगट यांचे नुकतच दु:खद निधन झाले. त्यांच्या दु:खद निधनाबद्दल नळदुर्ग येथे रिपाइंच्या वतीने त्याना भावपूर्ण श्रद्धांजली वहाण्यात आली.
याप्रसंगी रिपाइंचे दुर्वास बनसोडे, बाबासाहेब बनसोडे, अरूण लोखंडे, एस.के.गायकवाड, विठ्ठल जेटीथोर, राहुल, जेटीथोर, लक्षण जेटीथोर, जीवन गुळे, महेश वाघमारे आदी उपस्थित होते.