इटकळ दि. १९ : महामार्गावरील इटकळ ता. तुळजापूर या गावातील आठवड्यात दुस-यांदा अज्ञात चोरट्यांनी पुन्हा चार दुकान फोडी करुन अंदाजे लाखो रुपयाच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारुन एकप्रकारे पोलीसांनाच आव्हान दिले आहे. या घटनेत कापड दुकान, बीअर शॉपी, मेडीकल स्टोअर्स, गॅस सर्व्हिसेस या दुकानातील काही ऐवज लंपास करुन चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. सदरील घटना बुधवार रोजी पहाटेपूवी घडली आहे. दरम्यान, दोन दिवसापूर्वीच येथे दोन ठिकाणी चोरी झाली होती.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावरील इटकळ ता. तुळजापूर येथील पोलीस चौकी समोरील मुजावर कॉम्पलेक्स मधील श्रद्धा साडी सेंटर, अलमदीना गॅस सर्व्हिसेस, जयश मेडिकल स्टोअर्स या दुकांनाचे शेटर अज्ञात चोरट्यांनी उचकटुन टाकले. यात साडी दुकानातील दिड लाखाच्या किंमती साड्यांची गठ्ठे लंपास केले. तर इतर दुकानातील गल्ल्यातुन किरकोळ रक्कम चोरट्यांनी चोरुन नेली. तसेच अंजुम जनरल स्टोअर्स या दुकानाचे शटर उचकटन्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे असलेले प्रियांका बियर शॉपीचे शटर उचकटुन त्यामधील बिअरचे बॉक्स लंपास केले. रात्री विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने अंधारात दुकानाच्या पाठीमागील बाजुस बसुन पिलेल्या बियरचे रिकामे डबे सोडून गेले.
दरम्यान, या चोरीच्या तपासासाठी उस्मानाबाद येथील ठसेतंज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. याबाबत श्रद्धा साडी सेंटरचे मालक आदिनाथ बागडे यांनी इटकळ पोलीसात तक्रार दिली आहे.