नळदुर्ग, दि. 19 : जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून तुळजापूर तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने बुधवार दि. १९ ऑगस्ट रोजी नळदुर्ग येथील रामतीर्थ देवस्थान परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.
नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक जगदिश राऊत यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. तसेच छायाचित्रकारांचा सत्कार सपोनि राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जेष्ठ फोटोग्राफर अशोक मायाचारी, कोर कमेटी सदस्य शिवानंद खुने, महेबूब शेख, संजय कुभार, तुळजापूर तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष निजाम शेख, सचिव शिवानंद नाटेकरी, कार्यध्यक्ष अनिल जाधव, कार्यवाहक अलीम शेख, नितीन गायकवाड, सचिन राठोड, किरण कांबळे, गणेश जवळगे, खंडू टकले, सलीम शेख, रामतिर्थ गावचे सरपंच बालाजी राठोड आदीजण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार निजाम शेख यांनी मानले.