इटकळ, दि. 19 : तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिका-याने चक्क आरोग्य केंद्रात दारु पिऊन गोंधळ घातल्याची घडली आहे. याप्रकरणी दुरक्षेत्र इटकळ पोलीस चौकीत सरपंचाच्या पतीने फिर्याद दिली आहे.
तुळजापूर तालुक्यातील काटगाव आरोग्य केंद्रा अंतर्गत १६ गावांचा समावेश आहे. या केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र भगवान पुंडे हे या सोळा गावातील आरोग्य सेवा देतात. मात्र अशा नाजुक परिस्थितीत हे अधिकारी असे बेफीकीरपणा करताना दिसुन येत आहे. यांच्या पत्नीही ह्या आरोग्य केंद्रात सेवा बजावत आहेत. या पुर्वीही हे आधिकारी दारु पिऊन दावाखान्यात गोंधळ करताना आढळून आले होते. त्यावेळी गावातील लोकांनी समज दिली होती.
बुधवार दि. १९ ऑगस्ट रोजी सदरील वैद्यकीय सकाळी दारुच्या नशेत दवाखान्यात दाखल झाले. दारूच्या नशेत रुग्णालयात रुग्णावरती उपचार सुरू केले होते. त्यावेळी गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे काटगाच्या काही लोकांनी त्यांना त्या अवस्थेत इटकळ पोलीस चौकीत आणले. याबाबत सरपंचांच्या पती सोमनाथ कांबळे यांनी इटकळ पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे.