तुळजापूर, दि. 19 : श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, विधवा, अपंग, 21 हजार रुपयांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे लाभार्थ्यांना तात्काळ देण्यात यावे, अशा मागणीचे लेखी निवेदन बुधवार दि. 19 ऑगस्ट रोजी मनसेचे जिल्हासंघटक अमरराजे कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तहसिलदार यांना देण्यात आले.
निवेदनात नमूद केले आहे की, संसर्गजन्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब नागरीकांचे खुपच हालअपेष्ठा होत आहेत. तसेच तुळजापूर तालुक्यातील अपंग, विधवा महिला, श्रावणबाळ, दिव्यांग यांच्यासह सामान्य गोरगरीब लाथार्थ्यांना श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, विधवा, अपंग, 21 हजार रुपयांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रासाठी व त्यांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहेत. त्यामुळे गरजू व लाभार्थ्यांना त्यांच्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तहसील कार्यालयामार्फत वरील प्रमाणपत्र तात्काळ वितरीत करावी, अशी मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे.
यावेळी शहराध्यक्ष धर्मराज सावंत, तालुका उपाध्यक्ष अक्षय साळवे, मनविसेचे प्रमोद कदम, मनविसे जिल्हा सचिव सुरज कोठावळे, तालुका उपाध्यक्ष उमेश कांबळे, तालुका सचिव शशिकांत तांबे, झुंबर काळदाते, संतोष दुधभाते, सौरभ लोखंडे, विशाल माने आदी पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या...