नळदुर्ग  दि.१९ : शहरातील उपजिल्हा रूग्णालय त्वरीत सुरु  करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुधवारी राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, नळदुर्ग येथे होत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम संथगतीने होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यापासून नळदुर्ग शहर व परिसरातील नागरिकांना व एखादया अपघातग्रस्त व्यक्तीला उपचारासाठी जिल्हयाच्या ठिकाणी गेल्या शिवाय पर्याय नव्हता. या काळात नागरिकांना आरोग्या संदर्भात अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागत आहे. सदरील उपजिल्हा रुग्णालय सुरु झाल्यास नळदुर्ग शहरासह परिसरातील 60 गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे नळदुर्ग शहरासह परिसरातील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवून तात्काळ उपजिल्हा रुग्णालय सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष  मारुती बनसोडे यांची स्वाक्षरी आहे. या निवेदनाची एक प्रत उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे.


 
Top