अणदूर, दि. 16 : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील हॅलो मेडिकल फाऊंडेशन येथे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी हॅलो संस्थेच्या वतीने कार्यक्षेत्रातील ७० गावामधून कार्यरत असलेल्या पुरुष प्रेरक, महिला प्रेरीका, व मानसमित्र अश्या ९० कार्यकर्त्यांना कोरोना प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकी सुरक्षा किट ((N-95) मास्क, सॅनिटायझर, हॅन्डवाँश, साबण) व लोहारा व तुळजापूर तालुक्याकरिता तालुका समन्वयकाना थर्मामिटर व ऑक्सिमीटर आदी साहित्याचे वाटप माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ शशिकांत अहंकारी, डॉ शुभांगी अहंकारी, सुधाकरराव अहंकारी, यांच्यासह संस्थेतील सर्व विभागाचे प्रमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.